बियॉंड सेक्स - वाचकांचे अभिप्राय

प्रिय सोनल मॅडम,
बऱ्याचदा मला एक प्रश्न सतावत असायचा,…श्रीकृष्णाने राधाशी लग्न का नसेल केलं? जिच्यावर एवढं निखळ,निस्वार्थ,भरभरून प्रेम केलं… तिच्याशी लग्न का नसेल केलं? याचे उत्तर मिळविण्याचे मी प्रयत्न देखील केले,मला विभिन्न तर्क असलेली उत्तर देखील मिळाली,पण श्रीकृष्णाची भक्त म्हणून मी ज्या भक्तिभावाने कृष्णाला ओळखलं,बघितलं त्यावरून माझ्या मनाला ती तर्क पटली नाही.जसजसी वैचारिक परिपक्वता विकसित होत गेली मला माझ्या प्रश्नाचं एक अंतिम आणि तार्किक उत्तर गवसलं. श्रीकृष्णाने ज्या राधावर स्वत:पेक्षा अधिक प्रेम केलं तिच्याशी लग्न न करण्याच कारण किंबहुना समाजासमोर मांडायचा आदर्श हाच असायला हवा की “मोह,शारीरिक आकर्षण,वयोमर्यादा,शरीर,बाह्य सुंदरता किंवा बाह्य देखावा,लैगिकता,सो कॉल्ड “खानदान की इज्जत”,सामाजिक प्रतिष्ठा आणि एवढचं काय तर लग्न…. ” या असंख्य मानवनिर्मित कृत्रिम बंधनाच्या कितीतरी पलीकडे प्रेम असते!… खरे प्रेम असते!आणि म्हणूनचं की काय? लग्न जरी रूक्मिणीशी केलं तरी कृष्णाच्या नावाअगोदर,कृष्णाच्या अभंगात,कृष्णाच्या कथेत,कृष्णाच्या देऊळात,कृष्णाच्या हृदयात आणि कृष्णाच्या कणाकणात फक्त आणि फक्त राधाचं असते! “बियॉन्ड सेक्स” ही कादंबरी वाचल्यानंतर अगदी हीच भावना माझ्या अंर्तमनातून आली! आजपर्यंत प्रेमावर कथा किंवा चित्रपट म्हटलं की त्याच टिनएजर च्या,कॉलेजातल्या तरूण मुला-मुलींच्या कहाण्या.”पॅच-अप”, “ब्रेक-अप” अश्या नावांनी प्रेमासारखी संवेदनशील भावना जोडणारी आणि तोडणारी ही तरूणाई…. त्यात तुमच्या कादंबरीतील वयाच्या चाळीशीतल्या एका आगळ्यावेगळ्या,निखळ प्रेमाची कथा नक्कीचं समाजासमोर एक आदर्श मांडते.संपूर्ण कथा,कथेतील पात्र,त्यांच्या भावना, मैत्री , प्रेम ,समंजसपणा,एकमेकांप्रतिचा त्यांच्या नात्यांप्रतिचा आदर… एकूण सगळचं अतिशय उत्कृष्ट आहे! आणि कादंबरीचं शिर्षक कथेला १००% न्याय देणार आहे!
सागर आणि मिराची मैत्री आणि निस्वार्थ प्रेमाबद्दल वाचून मी येथे एक स्वलिखित चारोळी लिहीण्याचा मोह आवरू शकले नाही ….
“कौन कहता है सहाब
की महज जिस्म सोप देने से ही
होती है मोहब्बत…
कहने को तो चंद्रमुखी भी एक तवायफ ही थी
पर उसे तो देवदास से बिना छुए ही
बेइंतेहा मोहब्बत हो गयी थी!”

सोनल मॅडम,तुमची लेखणी अशीच वृक्षाप्रमाणे बहरावी,आणि तिच्या नव अंकूरातून जन्मलेल्या साहित्यातून समाजाचा उद्धार व्हावा!
एकदा नक्कीच भेटेलं तुमच्याशी….
पुढील लिखाणाकरिता मन:पूर्वक शुभेच्छा.🌹

निकिता शालिकराम बोंदरे. कोराडी, नागपूर.

जीवनाचा वेग ज्यांना उमगला  तो पुढे जात राहिला, आणि ज्यांनी या वेगाकडे दुर्लक्ष केले ते संघर्षाचा सेतू पार करण्यात  अपयशी ठरले. लॉकडाऊनमध्ये तब्बल सहा महिने उंबऱ्याच्या आत राहणे साऱ्या  देशासाठी अनिवार्य होते, आशावेळी जगण्याच्या वेगाचा अर्थ कसा लावणार असा प्रश्न काहींच्या मनात नक्कीच असेल, मात्र यासाठी  सोनल गोडबोले यांच्यासारख्या व्यक्ती व लेखन याकडे पहायला हवे. कोरोना महामारीमुळे सहा महिने घरात राहणाऱ्यांमध्ये गोडबोलेदेखील होत्या. या सहा महिन्यात लॉकडाऊनच्या बातम्या, मृत्यूचे आकडे, यासंबधीचे मनावर दडपण आणणारे व्हिडीओ पाहण्यापेक्षा हातात पेन, कागद घेतला  आणि एका बैठकीत ‘बियॉन्ड सेक्स’ ही कादंबरी गोडबोले यांनी  लिहून काढली. जबरदस्त अशी ही कादंबरी आहे. कादंबरीच्या शिर्षकामुळे अनेकांना ही कादंबरी घ्यावीशी वाटली असली तरी जेव्हा ती वाचून पूर्ण होते, तेव्हा वाचक विलक्षण प्रभावित होतो. खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून सध्या कौटुंबिक (पती, पत्नी) कलह निर्माण होत आहेत.  विवाहानंतर मैत्री वर्ज्यच !  आशा मानसिकतेने जगणाऱ्यांचे सांसारिक आयुष्य तर  वादळांनी भरलेले असते. मात्र मनी निरीच्छ भाव ठेऊन वैवाहिक जीवनाला कोणताही धक्का न लावता एकमेकांवरील अतुट विश्वासामुळे मैत्रीचे नाते मनोभावे कसे जपता  येऊ शकते हे  ‘बियॉन्ड सेक्स’  ही कादंबरी सांगते.   अतुट विश्वास, कौटुंबिक कर्तव्य  या कादंबरीतील पात्रांमध्ये ठासून भरला आहे. चाळीसी पार केल्यानंतर निसर्गताच महिला, पुरुष दोघांनाही आपल्या मित्र, मैत्रिणींमध्ये  रमावेसे वाटते, एकप्रकारची उर्जा, उत्साह निर्माण निर्माण झालेला असतो. आशावेळी आपली बकेट लिस्ट बाहेर काढावी अन् आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या अनेक गोष्टी पूर्ण कराव्यात असा विचार मनात येतो.  आणखी जगण्याविषयीची  आस निर्माण होते. विवाहानंतर वयाच्या चाळीशीचा टप्पा पार करणारे पती, पत्नी या दोघांनाही निखळ मैत्रीची अनुभूती घ्यावीशी वाटत राहते, तारुण्यातील प्रवासाचा थरार अनुभवावा, उंचावरून जमीनीवर आदळणाऱ्या धबधब्याखाली मनसोक्त भिजावे, पावसात ओलेचिंब झाल्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका गाडीवर मिरची भजी व कडक चहा प्यावा  तोही  एका निरीच्छ मित्रासोबत. अर्थात यामध्ये जोडीदाराशी प्रतारणा हा विचार कोसो दूर ठेवत.  ‘बियॉन्ड सेक्स’  ही कादंबरी वाचकांना हाच अनुभव देते. यामध्ये लेखिका  एका बाजूला वैवाहिक जीवनातील कर्तव्य, प्रेम, जबाबदारी यांना अजिबात बगल देत नाही, तर दुसऱ्या बाजूला मैत्रीचा भाव, पती, पत्नींच्या नात्यातील विश्वास खूबीने मांडत राहते.  या कादंबरीत सागर व मिरा हे दोन्ही आपापल्या कुटुंबावर विलक्षण प्रेम करणारे, मात्र मैत्रिसाठी  असुसलेले.  मिरा आणि सागर  एकमेकांच्या आयुष्यात येताना व आल्यानंतरचे कादंबरीतील वर्णन वाचताना  ते किती अचुक आहे हे वाचकच मान्य करतो. मिराला वाटते की आपल्याला सागरसारखा  मित्र मिळाल्याने जगण्यात एकप्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे, हीच भावना सगरचीही  आहे. मिरा आणि सागर  यांची मैत्री तर समीर  व राधा यांच्याठायी असलेला विश्वास हे वाचताना असे वाटते की माणसे इतक्या विश्वासाने का नाहीत पाहत प्रत्येक नात्याकडे. सोनल  गोडबोले यांची ‘बियॉन्ड सेक्स’  ही कादंबरी वाचताना वाचक मिराही होतो, सागरही होतो आणि समीर , राधाचा भावही त्यांच्या मनात निर्माण होतो. लेखिका गोडबोले यांच्या लेखनाचे कौशल्य हेच की अत्यंत सावधपणे ते लिहित राहिल्या आहेत, शिवाय वाचकांनाही ते प्रत्येकवेळी सावरताना  दिसल्या आहेत. एकुणातच काय तर गाणे अन चित्रपट आवडला तर आपण त्याला ‘ ‘वन्समोअर’  म्हणतो. आयुष्यदेखील आवडलेले असते प्रत्येकाला , पण आयुष्याला ‘वन्समोअर’  म्हणता येत नाही, याची जाणीव नकळतपणे ही कादंबरी करून देते. 
 
श्री. सचिन वायकुळे,
स्मार्ट अ‍ॅकॅडमी भाषण प्रशिक्षण केंद्र, बार्शी
नावातच मुळात गम्मत आहे..*
*मला पूर्ण कादंबरी अतिशय आवडली. वाक्य, शब्द रचना , भाषा अगदी सहज, सरळ आणि समर्पक आहे … निखळ प्रेम व्यक्त करण्याचा संस्कारीत प्रयत्न केलेला आहे. रसिकांना निश्चित आवडेल. शेवट ही खूप छान घेतला आहेस… सिरीअल प्रमाणे उगीच लांबन लावले नाही…. शेवटी मात्र तुम्ही डोळ्यांत पाणी उभे केलेत…great.*
*कादंबरी वाचून पुर्ण झाल्यावर प्रामाणिक पणे सांगावेसे वाटते… तुमची ही पहिली कादंबरी नसावी… एखाद्या सराईत कसलेल्या क्रिकेटपट्टू सारखी चौफेर लीलया शाब्दिक चौकार आणि कवितांचा षटकार मारीत रोमांटिक शतक केल्या सारखे वाटते….* *लवकरच आपल्या कविता, पुस्तके, कादंबरी यांची साहित्यिक बाग फुलेल आणि सर्व रसिकांना वेड लावेल असे माझे ठाम मत आहे. १८ वयापासून कुठल्याही वयोगटासाठी वाचाण्या योग्य अशी कादंबरी आहे. कादंबरी म्हणजे लेखकांसाठी कसोटी असते त्यात तुम्ही १०० मार्कांनी पास झालेला आहात.*
*दृष्ट लागावे असे रोमँटिक लिखाण आहे….!!  Sex नाव आहे…. म्हणून Sex च्या शोधात रसिक पानांच्या मागे मागे धावतो आणि romantic रसात भिजतो… सोनल जी तुम्ही ही कादंबरी लिहिली नसून जगल्या आहात असे वाटते.*
*All the best…Beyond Sex.*
*आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा…!!!*
 
*शुभेच्छूक :- बाळकृष्ण नेहरकर*

*( कवी, निवेदक, अभिनेता, होम मिनिस्टर फेम) 9422080313.*

नावातच मुळात गम्मत आहे..*
*मला पूर्ण कादंबरी अतिशय आवडली. वाक्य, शब्द रचना , भाषा अगदी सहज, सरळ आणि समर्पक आहे … निखळ प्रेम व्यक्त करण्याचा संस्कारीत प्रयत्न केलेला आहे. रसिकांना निश्चित आवडेल. शेवट ही खूप छान घेतला आहेस… सिरीअल प्रमाणे उगीच लांबन लावले नाही…. शेवटी मात्र तुम्ही डोळ्यांत पाणी उभे केलेत…great.*
*कादंबरी वाचून पुर्ण झाल्यावर प्रामाणिक पणे सांगावेसे वाटते… तुमची ही पहिली कादंबरी नसावी… एखाद्या सराईत कसलेल्या क्रिकेटपट्टू सारखी चौफेर लीलया शाब्दिक चौकार आणि कवितांचा षटकार मारीत रोमांटिक शतक केल्या सारखे वाटते….* *लवकरच आपल्या कविता, पुस्तके, कादंबरी यांची साहित्यिक बाग फुलेल आणि सर्व रसिकांना वेड लावेल असे माझे ठाम मत आहे. १८ वयापासून कुठल्याही वयोगटासाठी वाचाण्या योग्य अशी कादंबरी आहे. कादंबरी म्हणजे लेखकांसाठी कसोटी असते त्यात तुम्ही १०० मार्कांनी पास झालेला आहात.*
*दृष्ट लागावे असे रोमँटिक लिखाण आहे….!!  Sex नाव आहे…. म्हणून Sex च्या शोधात रसिक पानांच्या मागे मागे धावतो आणि romantic रसात भिजतो… सोनल जी तुम्ही ही कादंबरी लिहिली नसून जगल्या आहात असे वाटते.*
*All the best…Beyond Sex.*
*आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा…!!!*
 
*शुभेच्छूक :- बाळकृष्ण नेहरकर*

*( कवी, निवेदक, अभिनेता, होम मिनिस्टर फेम) 9422080313.*

नावातच मुळात गम्मत आहे..*
*मला पूर्ण कादंबरी अतिशय आवडली. वाक्य, शब्द रचना , भाषा अगदी सहज, सरळ आणि समर्पक आहे … निखळ प्रेम व्यक्त करण्याचा संस्कारीत प्रयत्न केलेला आहे. रसिकांना निश्चित आवडेल. शेवट ही खूप छान घेतला आहेस… सिरीअल प्रमाणे उगीच लांबन लावले नाही…. शेवटी मात्र तुम्ही डोळ्यांत पाणी उभे केलेत…great.*
*कादंबरी वाचून पुर्ण झाल्यावर प्रामाणिक पणे सांगावेसे वाटते… तुमची ही पहिली कादंबरी नसावी… एखाद्या सराईत कसलेल्या क्रिकेटपट्टू सारखी चौफेर लीलया शाब्दिक चौकार आणि कवितांचा षटकार मारीत रोमांटिक शतक केल्या सारखे वाटते….* *लवकरच आपल्या कविता, पुस्तके, कादंबरी यांची साहित्यिक बाग फुलेल आणि सर्व रसिकांना वेड लावेल असे माझे ठाम मत आहे. १८ वयापासून कुठल्याही वयोगटासाठी वाचाण्या योग्य अशी कादंबरी आहे. कादंबरी म्हणजे लेखकांसाठी कसोटी असते त्यात तुम्ही १०० मार्कांनी पास झालेला आहात.*
*दृष्ट लागावे असे रोमँटिक लिखाण आहे….!!  Sex नाव आहे…. म्हणून Sex च्या शोधात रसिक पानांच्या मागे मागे धावतो आणि romantic रसात भिजतो… सोनल जी तुम्ही ही कादंबरी लिहिली नसून जगल्या आहात असे वाटते.*
*All the best…Beyond Sex.*
*आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा…!!!*
 
*शुभेच्छूक :- बाळकृष्ण नेहरकर*

*( कवी, निवेदक, अभिनेता, होम मिनिस्टर फेम) 9422080313.*

सोनल गोडबोले यांचं साहित्यातील हे तिसरं पाउल.. यापूर्वी त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित झालेत.. त्यांचा विषय पण प्रेम हाच होता.. प्रेमावरचं त्यांचं लिखाण हे वाखाणण्याजोगं आहे.  हाच विषय घेउन त्यांनी कादंबरी लिहीली.. तसं पाहीलं तर सेक्स या विषयावर लिखाण होवुन गेलय पण त्याची धाटणी वेगळी आहे. मनात येणाऱ्या सगळ्या भावना मिरा प्रवाहीत होवुन देते पण त्याचा संबंध शरीराशी न जोडता मनाशी जोडते.. त्यामुळे कादंबरी एका वेगळ्याच उंचीवर जाते.. मिरा आणि समीरची ही कथा असली तरी मिराच्या मनात घोंगावणाऱ्या वादळाची ही कथा..

विचारांचा हा आवर्त शेवटी एका समाधानी बिंदुवर येउन स्थिरावतो.. नव्या पिढीला एक वेगळा विचार लेखिका या कादंबरीतुन देतेय.. ही पिढी भटकण्यापासुन निश्तित वाचेल.. माझ्या दृष्टीने हे कादंबरीचे फलित आहे.. सोप्या भाषेत लिहिल्याने कादंबरीचा शब्दपट आपल्यासमोर उभा रहातो..
लेखिका मुळात कवयित्री असल्यामुळे हळुवार भावनाची पखरण कादंबरीत आपल्याला दिसते.. खुप वेगवेगळ्या ढंगाच्या कविता यात दिसतात..
  अजुन एक गोष्ट आवर्जुन सांगावी वाटते ती म्हणजे कादंबरीची नायिका शरीराच्या फिटनेस बद्दल खुप जागरुक आहे.. फिरणे.. योगा..जिम यातील तिची रुची वाखाणण्याजोगी आहे.. हा एक फार मोठा पण आवश्यक संस्कार लेखिकेने वाचकांवर.. तरुण वाचकांवर केलाय..
   कुठेही पाल्हाळीक वर्णन नाही.. जेवढं हवं तेवढेच विवेचन.. आणि पात्रांची आटोपशीर स्वभाव वर्णनं निखालस उतरवली आहेत की लेखिकेची पहिलीच कादंबरी आहे यावर विश्वासच नाही बसणार.. नाण्याला दोन बाजू असतात पण अधिक विचार करणारी व्यक्ती सांगते नाण्याला तीन बाजु असतात.. लेखिकेने प्रेमाच्या कहाणीत तिसरी बाजु कशी असते आणि तिच किती महत्वाची असते याची उदाहरणे जागोजागी दिली आहेत त्यामुळे वाचनाची उत्कंठा वाढते..
   सुंदर मुखपृष्ठ ही आणखी एक जमेची बाजु.. साधं पण मनावर हवा तसा परिणाम करणारे मुखपृष्ठ.. चेतक बुक्स ने प्रकाशित केलेली ही कादंबरी ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे.. प्रत्यक्ष वाचा आणि आनंद लुटा.. कारण…
Beyond sex there is always Love
 
Govind Godbole
Miraj  9822350549
*बियाँन्ड सेक्स* आज वाचलं आत्ताच वाचून झालं आणि वाटलं आत्ताच रिप्लाय द्यावा .
१६ ऑगस्ट ला म्हणजे मागच्या च महिन्यात माझी सहचारीणी मला कायमची सोडून गेली.
😭 😭😭 खरतर हे सांगण्या मागचा हेतू म्हणजे जसं जसं मिरा चं पात्र मि वाचत होतो तसा तसा मला माझ्या आयुष्याचा उलघडा होत होता आणि  माझ्या आयुष्याशी त्याचा ताळमेळ जुळत होता कारण प्रत्यक्षात माझ्या आयुष्यात सततच मीरा चं पात्र मि आणि समिर चं पात्र माझी सहचारीणी करत होती.
याचं कारण म्हणजे माझ्यावरचा तीचा विश्वास आणि तिच्यावरचं माझं प्रेम.  
 
पण हे प्रेम एवढ्या लवकर संपुष्टात येईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
तुमचं लिखाण तीच्या आठवणीत पुन्हा एक रात्र जागुन काढण्यासाठी पुरेसं ठरलं.
डोळ्यातील अश्रू सह तुम्हाला पुढील साहीत्यासाठी भरभरून शुभेच्या !
कोरोणातुन जसा समिर बाहेर आला तसच माझ्या सहचारिणी ने कोरोणा वर मात केली असती तर मि नक्कीच सपत्नीक तुमची भेट घेतली असती.
आणि मला खात्री आहे तुमच्या पुढच्या साहीत्याचा ती एक भाग झाली असती. तुम्हाला समिर च्या स्व:भावाची मिरा भेटली असती.
 
माझ्या अर्धांगीणीला भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुमच्या पुढील साहीत्य प्रवासाला हार्दीक शुभेच्छा !
प्रविण वाघमारे  हडपसर, पुणे
बियाँड सेक्स कादंबरी वाचून मनाला खूप बरं वाटलं .  शेवट पर्यंत लेखिकेने सस्पेन्स ठेवला .  शेवट काय असेल ,  असा विचार क्षणभर तरी मनात येऊन गेला .  आणि कादंबरी पूर्ण  वाचून झाली .  असं वाटलं की ,  अजून थोडं लिहायला हवं होतं , असं ज्यावेळेस वाटतं .  त्यावेळेस जीवनात नेहमी कमतरता असायला हवी , याची पुन्हा नव्याने जाणीव झाली .  म्हणजेच सर्व गोष्टी आयुष्यात मिळाल्या की , मिळालेल्या गोष्टींच मोल राहत नाही .  तर मीरा हे पात्र एवढ्या छान पद्धतीने रंगवलंय की , पत्नी कशी असावी , हे ह्या मीरा कडून शिकावं .  संसार ही उत्तमरित्या सांभाळते . मित्र , मैत्रिणी , मुलं , पती आणि आपली असणारी साहित्याची आवड ,  खरंच किती नम्रपणे जपते .  कुणालाही हेवा वाटावा , अशी ती मीरा .  पती पत्नीच्या नात्यामध्ये कधीही गैरसमज होऊ नये , चारित्र्यवर कोणी संशय घेऊ नये , आणि पती पत्नीच्या नात्याला कलंक लागू नये . असं हे मीरा आणि समीरची  जोडी  .  त्या दोघांपासून खरंच खूप शिकण्यासारखं आहे .  मैत्री कशी असावी , हे ही लेखीकेने मीरा आणि सागर ह्या दोघांच्या निखळ मैत्रीची कहाणी , खूप सुंदरपणे रेखाटली आहे .  सागर मीराची मैत्री एवढी घट्ट होते की , जणू शेवट असा होईल की , ते दोघेजण , मैत्रीपुरतं न राहता प्रेमात पडून , प्रेमात वाहत जाऊन , ते त्यांचं वेगळं जग निर्माण करतील .  असं शेवट पर्यंत वाटायचं . पण नाही , सागर आणि मीराची मैत्री खरंच खूप प्रेरणा देणारी आहे .  आणि सर्वांनीच सागर मीरा सारखी मैत्री जपावी . आणि मीरा समीर सारखं संसारात रमावं . भरभरून एकमेकांवर प्रेम करावं .  फक्त सुखात  सोबत नसून ,  दुःखातही आनंदानं जगावं .  म्हणजे जीवन नक्कीच सुखकर होईल . यात काही शंकाच नाही .
 
कवयत्री , लेखिका , कादंबरीकार
सोनल गोडबोले , तुमची  लेखणी अशीच बहरत राहो , मनापासून तुमचं कौतुक आणि अभिनंदन 💐💐💐💐💐
पुढील वाटचालीस मनःपूर्वक , काळजातून , आभाळभरून खूप खूप शुभेच्छा  !!!
 
 
कवी  –  अनिल शामराव केंगार
गाव  –  वाढेगांव ,  तालुका  –  सांगोला  जिल्हा  –  सोलापूर  पिन  –  413307  मोबाईल  –  9975117986
Sonal Madam
Read your book Beyond Sex it’s a very good Book not only good it’s extraordinary book. Mam you have really explained the society about real friendship or real love without Sex the role of Meera is fantastic . I also request all the persons including students also to read the book Beyond Sex for good future life with your life partner
Dr Dhiraj O Bihani ,  Solapur
 सोनल ताई तुमची कादंबरी वाचली. खूप सुंदर विचार मांडलेत तुम्ही. निखळ प्रेम म्हणजे काय. याचे सुंदर संस्कार आहे ही कादंबरी.मी अमेझाॅन वरुन मागवली ही कादंबरी.मला वाटत होत रत्नागिरी जिल्ह्यात एका खेडेगावात मिळेल की नाही पण मी मागवून बघुयातरी म्हणून प्रयत्न केले आणि साधारन सहा सात दिवसानी मला पुस्तक मिळालं .पूर्ण वाचल्यानंतर खूप छान वाटली कादंबरी. तुमच्या पुढील लेखनासाठी खूपसार्‍या शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹
सौ. राजश्री नारे  जैतापूर जिल्हा रत्नागिरी.
तुम्ही कादंबरी एवढी छान लिहली आहे की , बस्स  !!!  कादंबरी लिहताना समाजाचा विचार करून , समाजाला समोर ठेवून , वादविवाद , गैरसमज , मैत्री , प्रेम , आपुलकी , कौंटुबिक जीवन ,   आपला प्रपंच सोडून , अजूनही समाजाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे , आणि शिकवण्यासारखंही खूप आहे , कवी  – कवयत्री , लेखक  –  लेखिका , यांच्या विचारातून जे लेखणीत उतरतं , त्याचा परिणाम नक्कीच समाजावर पडत असतो , पण साहित्यही दर्जेदार असावं , तेव्हाच हा बदल घडतो , आणि तुमची कादंबरी म्हणण्यापेक्षा मी आपली कादंबरी  म्हणतो की , तिचा वाचकांच्या मनावर नक्कीच परिणाम झालाय , आणि अजूनही होणारच  , यात काही शंकाच नाही , कारण घेण्यासारखं भरपूर आहे , तुमच्या लेखणीला अजून बळ येवो , आणि तुमची लेखणी बहरत जावो , हिच ईश्वर चरणी प्रार्थना  🙏🏻🙏🏻 पुढील वाटचालीस मनापासून , काळजातून , आभाळभरून खूप खूप शुभेच्छा  !!!
मी ज्यावेळी कधी पुण्याला आलो की नक्कीच तुमची भेट घेऊन , तुम्हाला माझ्याकडून , एक छानशी आकर्षक  वही , पेन गिफ्ट देणार आहे , कारण ज्यांचं साहित्य मला आवडतं , त्यांना नक्कीच काहीतरी देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे ,  🙏🏻🙏🏻
 
*आचार विचारांची सांगड घालून*
*भावनेतून शब्दांना सजवूया*
*बियॉन्ड सेक्स दुसऱ्या आवृतीसाठी*
*लेखणीला सक्षम बनवूया*
 
 *कवी  –  अनिल शामराव केंगार*   *मोबाईल*-  9975117986
आज आपले बियॉन्ड सेक्स  हे पुस्तक वाचले . एका बैठकीत वाचून झाले . या  कादम्बरीतील समीर ,मीरा ,सागर ,राधा ही पात्रे   स्वत:च्या वागण्यातून  एक आदर्श  समाजात निर्माण करत आहेत . या जीवनात  स्त्री पुरुष सम्बंध केवळ लैंगिक उपभोगासाठी नाहीत . एकमेकाला समजून घेणे , गरजेच्या वेळी मदत करणे, कला व सौन्दर्याचा आस्वाद घेणे , लैंगिक उपभोगापेक्षा  प्रेम अधिक महत्वाचे आहे   व त्याहून पुढे व महत्वाचे  आहे  हा संदेश ही कादम्बरी देते .  सर्व वयोगटातील   सर्वानी वाचावी अशी ही कादम्बरी आहे .  आपले हार्दिक अभिनंदन!!

डॉ. एकनाथ कुलकर्णी
Finally काल रात्री कादंबरी संपली .
तुमच्या लिखाणाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
मीरा इतकं सुंदर व्यक्तिमत्व पुरुषच का तर एखादी स्त्री ही प्रेमात पडेल अशी ती मीरा.
ही कादंबरी ३_४ वर्षे आधी आली असती तर मला माझ्या आयुष्यातील सागर सांभाळता आला असता.  असो, दर आये दुरुस्त आये.
बाकी meera मला खूप आवडली, हे पात्र आयुष्यात नवीन स्वप्न आणि नवीन ऊर्जा deyel 

खऱ्या मीरा ला भेटायला मला नक्की आवडेल —  एक वाचक 

तुमची बियॉंड सेक्स कादंबरी वाचली. खुप छान मांडलेत तुम्ही सर्वांच्या मनातील भावना आणि विचार. ज्या बर्याच जणांना बोलून दाखवता येत नाही किंवा व्यक्त करायची भिती वाटते. आजच्या घडीला असे बरेचजण आहेत जे यातून जात आहेत. माझं वय काही अजून ४० नाहीये पण या भावना माझ्या मनात पण येतातच. असो.
क्षमस्व, मी डायरेक्ट एकेरी उल्लेख केला तुमचा. पण खुप रिलॅक्स वाटलं कादंबरी वाचून
 
एक वाचक