बियॉंड सेक्स - वाचकांचे अभिप्राय

बियॉन्ड सेक्स कादंबरी म्हणजे भावनांचा एक सुरेख Landscape . भावनांची खोली मांडताना सौंदर्यता व सौज्वळता जोपासली आहे. आयुष्यात चाळिशीनंतर होणारे बदल , एक वेगळी जडण घडण, आणि मैत्रिणीवर चे आकर्षण व प्रेम अगदी सहज मांडले आहे. कुठे हि विचारांची गल्लत नाही. एक मित्र व मैत्रीण ह्यांचे नाते शुद्ध आणि प्रेमळ असू शकते हे आवर्जून सांगितले आहे. विषय बोल्ड जरी असला तरी तो सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची जादू ह्या कादंबरीने केली आहे. कादंबरीच्या FLOW मध्ये कवितेचा उत्तम उपयोग केला आहे, थोडक्यात कादंबरी पुढे नेण्यासाठी उत्तम लिंक आहे. सर्वच प्रसंग, गप्पा. गोवा सहल, ह्यातील शब्दांची बांधणी खूप छान रंगवली आहे. कुठेही मादकतेचा अतिरेक नाही. चाळिशीत होणारी मैत्री, प्रेम, त्यात माणूस म्हणून येणाऱ्या काही भावभावना साहजिकच असल्या तरी बायको व नवरा म्हणून असलेली जबाबदारी एक कुटुंबवत्सल स्त्री आपले घर, आणि मित्र ह्यांची मिसळ न करता दोन्ही नाते उत्कृष्ट सांभाळी आहेत. Respect Relations is core of this Kadambari. आणि प्रेमच दोघांना उत्तमरीत्या बांधून ठेवू शकते हे ठामपणे मांडले आहे. मीरा, समीर आणि सागर यांच्याभोवती फिरणारे कथानक आपल्याला शत् प्रतिशत् खिळवून ठेवते

प्रेम म्हणजे नक्की काय असते, अवश्य वाचा बियॉन्ड सेक्स कादंबर

विलास रवंदे

सखी म्हणजे नेमकी कशी?आणि प्रेम कसं असावं? याच सुंदर वर्णन…
तू माझ्या साठी स्पेशल आहेस..या एका वाक्यासाठी जगणारे व ते वाक्य सिद्ध करणारे … तो फील देणारे नाते..म्हणजे प्रेम..

काल संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर केलेले पुस्तक आले.बियोन्ड सेक्स अस नाव नावावरून काही लोकांना वाटू शकतं अस काही वाचावं का? पण काही लोकांचे पुस्तकाबाबत अभिप्राय वाचले होते आणि कायमच अशा मैत्रीबाबत एक विचार होता की असा छान मित्र असू शकतो का?
खरच लेखिकेने म्हणजे सोनल गोडबोले यांनी अगदी छान मांडणी केलेली आहे चाळिशीत होणारी मैत्री …प्रेम…
त्यात माणूस म्हणून येणारे काही भाव भावना साहजिकच असल्या तरी बायको व नवरा म्हणून असलेली जबाबदारी व आपल्या माणसांची काळजी, प्रेम यालाही तितक्याच आत्मीयतेने जपणारे मीरा आणि सागर ..तसेच त्यांना साथ देणारे संसारातील सोबती म्हणजे समीर आणि राधा…..खरच किती छान आहेत सगळेच आणि असें जोडीदार व प्रेम करणारे मित्र आयुष्यात असले तर काय हवे अजून..मला जाम हेवा वाटला मीरा चा किती नशीबवान आहे आणि त्याच बरोबर समजूतदारदेखील…..अशा स्त्रीया आपला संसार तर सुखाचा करतात पण इतर स्त्रीच्या सुखाचा देखील तितकाच विचार करतात
खूप छान लेखन आणि खऱ्या अर्थाने प्रेमात पडावं अस सागर मीरा यांचं नातं..प्रेम कसं असावं आणि प्रेमाने काय जादू होते आपल्या आयुष्यात.. तीही कोठेही शारीरिक पातळीवर न जोडले जाता फक्त मनाने एवढं छान जोडले जाऊन एकमेकांना जीव लावता येणे किती सुखद ना…..
अशी मैत्री सर्वाना मिळो आणि सर्व सुखी होवोत… सेक्स च्या पलीकडचे प्रेम सर्वाना करता यावे..
लेखिकेला शुभेच्छा..
Beyond sex there is always love अगदी खरंय
सुवर्णा सातपुते ,  पुणे