प्रथम आवृत्ती प्रकाशन समारंभ - २९ ऑगस्ट २०२०



द्वितीय आवृत्ती प्रकाशन समारंभ - २७ ऑक्टोबर २०२०

बियॉंड सेक्स - वाचकांचे अभिप्राय
प्रिय सोनल मॅडम,
बऱ्याचदा मला एक प्रश्न सतावत असायचा,…श्रीकृष्णाने राधाशी लग्न का नसेल केलं? जिच्यावर एवढं निखळ,निस्वार्थ,भरभरून प्रेम केलं… तिच्याशी लग्न का नसेल केलं? याचे उत्तर मिळविण्याचे मी प्रयत्न देखील केले,मला विभिन्न तर्क असलेली उत्तर देखील मिळाली,पण श्रीकृष्णाची भक्त म्हणून मी ज्या भक्तिभावाने कृष्णाला ओळखलं,बघितलं त्यावरून माझ्या मनाला ती तर्क पटली नाही.जसजसी वैचारिक परिपक्वता विकसित होत गेली मला माझ्या प्रश्नाचं एक अंतिम आणि तार्किक उत्तर गवसलं. श्रीकृष्णाने ज्या राधावर स्वत:पेक्षा अधिक प्रेम केलं तिच्याशी लग्न न करण्याच कारण किंबहुना समाजासमोर मांडायचा आदर्श हाच असायला हवा की “मोह,शारीरिक आकर्षण,वयोमर्यादा,शरीर,बाह्य सुंदरता किंवा बाह्य देखावा,लैगिकता,सो कॉल्ड “खानदान की इज्जत”,सामाजिक प्रतिष्ठा आणि एवढचं काय तर लग्न…. ” या असंख्य मानवनिर्मित कृत्रिम बंधनाच्या कितीतरी पलीकडे प्रेम असते!… खरे प्रेम असते!आणि म्हणूनचं की काय? लग्न जरी रूक्मिणीशी केलं तरी कृष्णाच्या नावाअगोदर,कृष्णाच्या अभंगात,कृष्णाच्या कथेत,कृष्णाच्या देऊळात,कृष्णाच्या हृदयात आणि कृष्णाच्या कणाकणात फक्त आणि फक्त राधाचं असते! “बियॉन्ड सेक्स” ही कादंबरी वाचल्यानंतर अगदी हीच भावना माझ्या अंर्तमनातून आली! आजपर्यंत प्रेमावर कथा किंवा चित्रपट म्हटलं की त्याच टिनएजर च्या,कॉलेजातल्या तरूण मुला-मुलींच्या कहाण्या.”पॅच-अप”, “ब्रेक-अप” अश्या नावांनी प्रेमासारखी संवेदनशील भावना जोडणारी आणि तोडणारी ही तरूणाई…. त्यात तुमच्या कादंबरीतील वयाच्या चाळीशीतल्या एका आगळ्यावेगळ्या,निखळ प्रेमाची कथा नक्कीचं समाजासमोर एक आदर्श मांडते.संपूर्ण कथा,कथेतील पात्र,त्यांच्या भावना, मैत्री , प्रेम ,समंजसपणा,एकमेकांप्रतिचा त्यांच्या नात्यांप्रतिचा आदर… एकूण सगळचं अतिशय उत्कृष्ट आहे! आणि कादंबरीचं शिर्षक कथेला १००% न्याय देणार आहे!
सागर आणि मिराची मैत्री आणि निस्वार्थ प्रेमाबद्दल वाचून मी येथे एक स्वलिखित चारोळी लिहीण्याचा मोह आवरू शकले नाही ….
“कौन कहता है सहाब
की महज जिस्म सोप देने से ही
होती है मोहब्बत…
कहने को तो चंद्रमुखी भी एक तवायफ ही थी
पर उसे तो देवदास से बिना छुए ही
बेइंतेहा मोहब्बत हो गयी थी!”
सोनल मॅडम,तुमची लेखणी अशीच वृक्षाप्रमाणे बहरावी,आणि तिच्या नव अंकूरातून जन्मलेल्या साहित्यातून समाजाचा उद्धार व्हावा!
एकदा नक्कीच भेटेलं तुमच्याशी….
पुढील लिखाणाकरिता मन:पूर्वक शुभेच्छा.
–निकिता शालिकराम बोंदरे. कोराडी, नागपूर.
*( कवी, निवेदक, अभिनेता, होम मिनिस्टर फेम) 9422080313.*
‘बियॉंड सेक्स’ ही सोनल गोडबोले यांची कादंबरी वाचली. कादंबरीच्या नावाची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मीरा, सागर, समीर या व्यक्तीरेखा पूर्ण उभ्या केल्या आहेत मीरा एक स्त्री, पत्नी, आई, मैत्रीण व मनात दडलेली एक प्रेयसी आहे. तिच्या मनाची पटलें अगदी प्रभावीपणे उलगडली आहेत. वाचताना नकळत वाचक सागर आणि मीरा होऊन जातो. आपल्या विशीत जातो. आता सागर व मीरा सेक्स पर्यंत जाऊन पोहोचतात का?? या वाचकांच्या मनातील प्रश्नाला लेखिकेने अतिशय चतुराईने शह दिला आहे. एक पुरुष व एक स्त्री यांची मैत्री फक्त सेक्स पर्यंत हे लोकांच्या मनावरील मळभ दूर केले आहे. सेक्स च्या पलीकडे ही एका स्त्री मनाला बरंच काही हवं असतं… निखळ मैत्री आणि भावनिक आधार. आजच्या फास्ट लाईफमधे संसाराचा गाडा ओढताना दोघांनाही नोकरी व्यवसाय करावा लागतो, त्यातूनच बऱ्याच उणीवा राहतात. तरीही वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्या पार पाडत पुढे जात असतात पण कधीतरी, कुठंतरी मनात खोलवर अपूर्ण राहिलेल्या सुप्त इच्छा जाग्या होतात आणि मग अशी मीरा एखाद्या कृष्णाचा शोध घेते …… का? …. तर.. बियॉंड सेक्स साठी लेखिका सोनल गोडबोले यांचे खूप खूप अभिनंदन
Beyond Sex ही कादंबरी काल वाचली.
सोनल गोडबोले यांचं साहित्यातील हे तिसरं पाउल.. यापूर्वी त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित झालेत.. त्यांचा विषय पण प्रेम हाच होता.. प्रेमावरचं त्यांचं लिखाण हे वाखाणण्याजोगं आहे. हाच विषय घेउन त्यांनी कादंबरी लिहीली.. तसं पाहीलं तर सेक्स या विषयावर लिखाण होवुन गेलय पण त्याची धाटणी वेगळी आहे. मनात येणाऱ्या सगळ्या भावना मिरा प्रवाहीत होवुन देते पण त्याचा संबंध शरीराशी न जोडता मनाशी जोडते.. त्यामुळे कादंबरी एका वेगळ्याच उंचीवर जाते.. मिरा आणि समीरची ही कथा असली तरी मिराच्या मनात घोंगावणाऱ्या वादळाची ही कथा..