सोनल गोडबोले क्रिएशन्स या माझ्या वेबसाईटवर तुमचे स्वागत

" बियॉन्ड सेक्स " या माझ्या कादंबरीला भरगोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार

सोशल मीडिया संपर्क

माझ्याविषयी थोडंसं

मी मुळची कोकणातली त्यामुळे अभिनय आणि विविध कला उपजतच .. अनेक नाटकांतुन कामं करता करता आणि वाचन करताना लिहायला कधी लागले कळलच नाही..  चारोळ्या.. कविता लिहिताना पेपर आणि मासिकांसाठी लेखन केलं आणि त्यातूनच  कादंबरीचा जन्म झाला.. 

नुकत्याच सुरु केलेल्या युट्युब चॅनल द्वारे सेक्सरसाईज या नावाने लैंगिक शिक्षण देणे. यात सेक्स आणि एक्सरसाईज दोन्ही एकमेकाना कसे पूरक आहेत याची माहिती समाजाला कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता देते आहे. 

स्वतःची नाट्यरंजन कला ॲकॅडमी पुण्यात वारजे येथे आहे.  या अकॅडमीतुन गेले अनेक वर्षे शालेय विद्यार्थ्यांना  अभिनयाचे धडे देत आहे.  नाट्यरंजन कला ॲकॅडमीमार्फत अनेक एकांकिका आणि राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेतला. रोटरी आयोजित एकांकिका स्पर्धेत मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं  पारितोषिक  मिळाल आहे. 

सखु या स्वलिखित एकपात्रीचे अनेक प्रयोग सादर केले आहेत. 

२०१३ साली नटसम्राट या नाटकाचे सलग ८ प्रयोग (३१ तास ४५ मिनिटे)  पुण्यातील बालगंधर्व मंदिरात सादर करुन विश्वविक्रम केला. या नाटकात मी वेगवेगळ्या तीन भूमिका करुन म्हणजे २४ वेळा वेशभूषा२४ वेळा केशभूषा आणि २४ वेळा रंगभूषा करुन वेगळा विक्रम केला. 

२०१६ मधे झेंडा स्वाभिमानाचा  या मराठी सिनेमातील प्रमुख भूमिकेसाठी  मला पुण्यातील दादा कोंडके फाउंडेशन ने  सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक देऊन गौरवले. 

२०१८ ला मराठी साहित्य व कलावंत सम्मेलनात माझ्या लेखन कार्याचा गौरव मा. श्री. रोहीत दादा पवार (आमदार) यांच्या हस्ते मानपत्र देवून करण्यात आला. तसेच याच कार्यक्रमात मा.श्री. मेघराज भोसले ( अध्यक्ष चित्रपट महामंडळ) यांच्या हस्ते माझ्या प्रेम हे ( चारोळी संग्रह) आणि अभिसारिका ( कविता संग्रह) यांचं प्रकाशन बारामती येथे केले. 

२९ ऑगस्ट २०२० ला  “बियॉन्ड सेक्स” या कादंबरीचं प्रकाशन मा. श्री.  योगेश सोमण ( अभिनेतेदिग्दर्शकलेखक) आणि मा. श्री. मेघराज भोसले(अध्यक्षमराठी चित्रपट महामंडळ)  यांच्या हस्ते फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून कऱण्यात आले. या कादंबरीचे प्रकाशक पुण्यातील चेतक प्रकाशन आहे. 

२०२० च्या मे महिन्यात कोरोनावर गीत लिहून गीतकार म्हणुन लोकांच्या समोर आले. 

लेखनाची आवड जपताना अनेक सामाजिक कार्यात भाग घेते .  ह्यात वृद्धाश्रमात जाऊन मदत देणे ,  अंध मुलांना शिकवणे ,  वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबवले.  यापुढील काळात नवीन कादंबरी कथासंग्रह लिहिण्याचा मानस असुन.  लैंगिक शिक्षणाबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे .