लेख - भाग १
असं कंटाळून कसं चालेल..
अनुभवलेल्या चिंध्या
तरुण चाळीशी
माझं संपुर्ण लिखाण हे माझ्या नजरेतुन पुरुष कसा असेल .. कसा दिसेल.. कसा भासेल.. त्याच्या काय भावना असतील .. त्याला प्रेयसी , मैत्रीण, बायको कशी असावी वाटत असेल म्हणजेच मेल ओरिएंटल लिखाण असतं.. कारण अवतीभोवती प्रचंड पुरुषांचा गराडा असतो.. भाऊ.. नवरा.. बाबा.. सासरे.. मित्र असे असंख्य पुरुषांना पाहुन सतत खुप काही सुचत असतं.. बहीण नाही.. ननंद नाही.. मैत्रीणी कमी यामुळे स्त्रीच्या बाजुने कमी विचार केला गेला.. आज पहिल्यान्दाच स्त्रीला काय वाटतं , तिच्या मनातील प्रियकर कसा असेल हे लिहिणारेय.. स्त्री चा आदर करणारा, तिला या क्षणी काय हवय हे न सांगताही ओळखणारा.. तिच्या भावनांची कदर करणारा.. रांगडा.. मस्त पर्स्नॅलिटी .. हुशार .. काही गोष्टीवर फोकस्ड असणारा.. पोट आणि टक्कल अजिबात नसणारा.. सावळी कांती.. एवढी भली मोठी लिस्ट असताना तुम्ही म्हणताय स्त्री हृदय लिही सोनल.. झेपणारेय का हे सगळं .. नवऱ्याला विचारलं स्त्रीया फ्लर्ट कशा करतात तो म्हणतो तु मला कसं पटवलस तसच.. पडले ना तोंडावर.. आता काय लिहावं?..त्या आधी विश्वास पहात असाव्यात..स्त्रीच्या शरीराकडे न पहाता मनात डोकावणारा असावा.. कारण बाह्यसौंदर्य हे क्षणीक असतं.. त्याचे आचार विचार कसे आहेत हे पहात असाव्यात.. फिरायला नेणारा, खरेदीला नेणारा मारुतीच्या शेपटीसारखी वाढणारी लिस्ट आहे ही..
प्रियकर
स्त्रीया चाळीशीत अजुनच सुंदर दिसतात.. याचं कारण त्या वयात मुलं मोठी झालेली असतात .. स्वताकडे लक्ष द्यायला भरपुर वेळ असतो..हळुच एखादा पांढरा केस डोकावायला लागलेला असतो.. नवीन दागिना चष्माच्या रुपात खुणावत असतो.. त्याला जवळ घ्यायला मन कचरत असतं पण डोळे त्याच्याकडे कटाक्ष टाकुन असतात.. केसांना वेगळेवेगळे रंग इंद्रधनु सारखे मुक्त विहरत असतात.. राहुन गेलेली कपड्यांची फॅशन पोट, कंबर वाढली तरी त्यावर त्या फॅशन ला कोंबणे ही कला जमायला लागलेली असते..वय विचारायचं कोणी धाडस करु नये आणि केलं तर अंटी मत कहो ना अशा रोमॅन्टिक वाक्यानी तुमची कर्णपटलं अजुनच सुमधुर संगीत ऐकल्याचा फील द्यायला लागतात.. आताही कोणीतरी चोरुन आपल्याकडे पहावं आणि आपली तारीफ करण्यासाठी चाललेली धडपड जेव्हा पन्नाशीतील व्यक्तीकडुन होते तेव्हा तिच्या हृदयातील धडधड तिशीतील बोक्याने ऐकावी अशी काहींशी स्वप्न..इतक्यात शेजारचा छोटा मुलगा जेव्हा काकु म्हणुन हाक मारतो तेव्हा ते पहाटेचं स्वप्न नाही ना म्हणुन तिची चाललेली धडपड हे सगळं इतकं रोमॅन्टिक विशीतही घडत नाही .. त्यामुळे विशीतील पाऊस आणि चाळीशीतील पाऊस यात तीला चाळीतील पाऊस अधिक रोमांचित करतो.. ❤