लेख - भाग २

आकाशी साडी

    पंचमहाभुतांपैकी एक तत्व आकाश …आकाशी रंग माझा आवडीचा रंग..प्लेन आकाशी सारी आणि त्यावर काळ्या रंगाचे स्लिव्हलेस ब्लाउज एखादे कानातले किंवा नेकपीस…
पण याला हवी साजेशी स्लिम फिगर..आणि cherry on Top म्हणुन पाऊस..साडीवर मनसोक्त भिजायचे कुडकुडत गरमागरम मक्याचे कणीस आणि coffee कशी वाटली आयडीयाची कल्पना..ही सगळी माझी कल्पना किंवा आवड असली तरी प्रत्येकीला वाटत असेल अस..पण अशीच एखादी आकाशी वाळत घातलेली साडी वरच्या मजल्यावरुन खालच्या मजल्यावरील टेरेसवर येउन फडफडत असेल आणि ती पाहुन त्या घरातील आजोबांना लावणी सुचली तर नवल नसावे.पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…ओल्या साडीकडे पाहुन आजीना अजुन यौवनात मी म्हणावे वाटले तर तरुणपण ते काय..
तीच साडी वाऱ्याने उडुन समोरच्या गच्चीवर असलेल्या नुकत्याच वयात आलेल्या मुलाच्या अंगावर पडली तर त्याच्या अंगावर येणारे रोमांच तर अहाहा..हीच साडी नेसुन दोन प्रेमवीर ताल धरताहेत आणि तेवढ्यात रेडीओवर ” नशा शराब मे होता तो नाचती बोतल”  हे बोल कानावर पडले तर
.ओल्या साडीत तो प्रियकर तिला उचलुन कवेत घेउन गोल फिरवताना तिचे expressions टिपायला मिळाले तर..अंगाला चिकटलेली साडी पाहुन पावसालाही न थांबता धोधो ओतावे वाटले तर..
साडी हे स्त्रीचे सौंदर्य खुलवणारे वस्त्र..मग ती आकाशी असो की गुलाबी..याच साडीच्या गोधडीत प्रेमाची उबही मिळते आणि यानेच स्त्रीचे पूर्ण शरीर झाकुन सौंदर्यही दाखवते..

बट

बट या शब्दातच किती रोमॅंस आहे ना.. काल पहिला पाऊस पडला म्हणुन टेरेसवर गेलो.. जवळपास ४२ डिग्री तापमानात तापलेली धरणी त्याला कवेत घेत होती.. तिचा प्रियकर म्हणजे आपला लाडका पाऊस जवळपास आठ महिन्याने तिला भेटत असतो.. इतक्या विरहानंतर  त्याला मिठीत घेतानाचा आनंद मला पहायचा होता..त्यांच्या मिलन सोहळ्यासाठी झाडे, पक्षी सज्ज होते.. कॅमेरात टिपता येइल  म्हणुन मी मोबाईल जवळ ठेवला आणि त्या सुखद क्षणाच्या साक्षीसाठी सज्ज होणार तितक्यात नजर समोरच्या टेरेसवर गेली..लाल साडीतील  सौंदर्य आणि वाऱ्यावर उडणारी तिची ती बट  यासाठीच कदाचित ढग भरुन आले होते का?? ..
      पाठमोरी तिची अदा कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात केली आणि थिरकणाऱ्या तिच्या अदानी आणि कंबरेभोवती असलेल्या सोनेरी पट्ट्याने मोहरुन जाणारा पहिलाच पुरुष नक्कीच नसावा मी.. तिने मानेला झटका दिला आणि तिचं कर्णफुल वाऱ्यावर नागफणीसारखं डोलत होतं .. दाटुन येणारं आभाळ धरणीसाठी आसुसलं होतं आणि माझा कॅमेरा तिच्या बटेसाठी.. कृष्णाच्या बासरीतुन निघणाऱ्या झंकारानी राधेच्या ह्दयातील ठोक्यांवर राज्य करावं आणि लोण्यातील गोळ्याने कृष्णाला देवत्वाचा विसर पडावा ना असं काहीशा फीलिंग्ज त्यावेळी माझ्या होत्या.. ना त्या झंकाराना कैद करु शकत ना त्या लोण्याला.. याला कशाची उपमाच न दिलेली बरी..बटेचही तसच काहीसं स्थान माझ्या आयुष्यत आहे..

काटा

 “काटा लगा हाय रब्बा” काय तो रोमॅन्टिक क्षण.. तुम्ही म्हणाल हिला काटा लागलाय आणि यातही हीला रोमॅंस दिसतो.. आपण ज्या नजरेने पहातो तसच आपल्याला दिसतं.. त्यादिवशी शेतात साडी नेसुन मुरडत असताना( मुरडायला कुठेही आवडतं) .. पुढे निघाले आणि काट्याने माझा पदर धरला.. क्षणभर थबकले.. मागे वळुन न पहाता ये सोड ना रे असं म्हटलं.. काटाच तो सोडायला थोडीच बसलाय.. मनात म्हटले यालाच प्रियकर करावं थोड्या वेळापुरतं..सोडतोयस का की मागे वळु?.. इतकं प्रेमाने म्हटल्यावर तो का माझा पदर सोडेल ना.. माझा आवाज चांगला नाही तरीही सुर धरलाच.. बंगले के पिछे तेरी बेरी के निचे..हाय रे पिया.. डायरेक्ट आशा पारेखच..तरीही हा माझा पदर सोडायचं काही नाव घेइना.. मग मात्र मला त्याच्यापाशी जाणं भागच पडलं.. मला माहीत होतं त्या निवडुंगात हात घातला तर काटा लागणार आणि सगळा रोमॅंस रक्तबंबाळ होणार.. त्या गुलाबी क्षणाचा आनंद आकाश, पानं, फुलं, झाडं सगळेच  घेत होते.. मोहरुन गेलेलं आभाळ भरुन आलं आणि निवडुंगानेही माझा पदर सोडला.. धावत , लाजतच चाफ्यापाशी पोचले तर तो म्हणतो  सोनल तु रोजच ये ना आम्हाला भेटायला आज मीही खुप दिवसाने लाजणाऱ्या स्त्रीला पाहिलं.. ऐकलं होतं की लाजल्या की स्त्रीया खुपच सुंदर दिसतात.. पुरुषांच्या खांद्याला खांदा द्या किवा नका देवु पण हे लाजणं , मुरडणं मात्र कधीही सोडु नकोस.. आम्हा पुरुषांचा तो श्वास आहे..😘😍

लोणचं

 माझ्या मित्राने त्याच्या मैत्रीणीचं नाव मुरलेलं लोणचं या नावाने नंबर सेव्ह केला… एकदा काय झालं त्याचा फोन कारमधे ठेवुन तो खाली उतरला तितक्यात  त्याचा फोन वाजला.. फोन समोरच असल्याने माझं लक्ष गेलं आणि नाव वाचुन खुप हसायला आलं.. तितक्यात तो आत आला त्याला म्हटलं तुला लोणचं आवडतं कारे?? तो म्हणाला अजिबात नाही.. का गं.. अचानक तुला लोणच्याची आठवण कुठुन आली.. अरे माझी एक मैत्रीण लोणची, पापड विकते ती म्हणत होती कोणाला हवं तर विचार म्हणुन असं ठोकुन दिलं.. तुझा फोन वाजत होता रें .. अगं लोणच्याचा फोन … दोघेही खुप हसलो.. म्हणुनच तुला लोणचं आवडतं का विचारलं मी..अगं तुला सांगायला हरकत नाही काही माझी मैत्रीण माझ्यापेक्षा सहा वर्षांने मोठी आहे आणि ती मला खुप आवडते म्हणजे प्रेम आहे माझं तिच्यावर.. अरे पण ते ठिक आहे पण जनरली पुरुषांना त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या मुली आवडतात ना.. वेडे आहेत गं असे पुरूष.. मुरलेलं लोणचं ते मूरलेलं.. त्याच्यात आंबट, तिखट, तेल , मीठ असं काही मुरलेलं असतं ना.. तुला नाही कळणार.. मी म्हटलं हो बरोबर आहे तुझं मला कसं कळेल पण आम्हाला पण मोठे पुरुष आवडतात.. जे आपल्याला समजुन घेवु शकतील असे..

आधारवेल

परवा शेतात फिरताना नजर गेली ती एका नाजुक वेलीवर.. मोठ्या झाडाचा आधार घेउन त्याला बिलगुन त्याच्यावर पूर्ण विसंबुन ती निवांत वाऱ्यावर झुलत होती.. असच काहीसं आपलं पण असतं.. खांद्यावर डोकं ठेवायला किवा हातात हात घ्यायला ज्याच्याजवळ त्याची हक्काची व्यक्ती आहे तोच भाग्यवान पण याहीपेक्षा त्याला ते किती टिकवायला जमतं हे जास्त महत्वाचं..
       झाडाकडुन त्या छोट्या वेलीला दुसरं हवय काय ?छोटासा   आधार आणि तो दिल्याने त्या झाडाला मिळणारा आनंद.. हेच आपण करु शकतो.. न सांगता आपल्या माणसाला काय म्हणायचय किंवा काय हवय हेच तर प्रेम ना..आपल्याला झाड होता आलं तर बरं ना .. एका वेलीला आधार दिल्याचा आनंद न  सामावणारा असेल.. पण त्याचसोबत अनेक वेलींचा गुंता झाला तर प्रत्येक वेल गुदमरेल आणि झाडालाही मोकळा श्वास घेता येणार नाही.. मी व्हीडीओत म्हटलं तसं की निसर्ग आपल्याला भरभरुन देतो आपल्याला काय घ्यायचय हे आपल्या हातात असतं.. त्या नाजुक वेलीने आणि त्या झाडाने मला प्रेम, विश्वास, कमिटमेंट, बांधीलकी आणि आधार हे सगळच दिलं.. तुम्हीही जेव्हा निसर्गात जाल तेव्हा या गोष्टीचा आनंद भरभरुन घ्या.. 

पदर

खरं तर पदर या शब्दाला बरेच अर्थ आहेत पण मी साडीच्या पदरबद्दल बोलतेय.. वात्सत्याची आणि ममतेची झालर असलेला साडीचा काही भाग म्हणजे पदर.. ” पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..” आम्ही स्त्रीया साडी घेताना पदर पहातो.. साडी प्लेन असुदेत पण पद्ऱ छान असावा.. आई जेव्हा बाळाला अमृत पाजायला पदराखाली घेते तेव्हा जगाच्या वाइट नजरांपासुन त्याचं संरक्षण हा पदर करतो.. जेव्हा प्रियकर धुतलेला हात पदराला पुसतो ना तेव्हाच्या फीलिंग्जस म्हणजे मोराने एक एक पिस सोडत पुढे जाणं आणि त्या वाटेवर ते मोरपिस हवेवर उडुन कानात कुजबुजल्याची चाहुल.. मग ती साडी कितीही महागडी असो हे सगळं प्रत्येकीला हवं असतं.. वाऱ्यावर उडणारा पदर आणि त्या पदराला आवरायला तिची चाललेली धडपड त्यातच तिचं साडीत अडखळुन पडणं आणि त्याने उचलुन कवेत घेतानाचा क्षण आणि तितक्यात जर पाऊस आला तर.. ओल्या साडीत भिजलेली ती राधा कोणाची नजर जावु नये म्हणुन त्याने लपेटलेला तो पदर ..

रोमान्स

खुप दिवसाने आज ती त्याला भेटली.. चार महिन्याने भेटल्याने तीने त्याला कडकडुन मिठी मारली .. पण त्या मिठीत तिला आधीचं प्रेम किवा ती हुरहुर जाणवलीच नाही.. क्षणात तीने मिठी सैल केली आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं पण तीला जे हवं होतं ते तिला दिसतच नव्हतं.. लॉकडाउन नंतर मानसिक, शारीरिक, आर्थिक यातुन रिलॅक्स होवुन त्याच्या मिठीत गेल्यावर तिला खऱ्या अर्थाने आज आनंद आणि प्रेम दोन्ही मिळणार होते .. ती काहीच बोलली नाही आणि तिच्या डोळ्यातुन अशृच्या रुपात ते नकळत ओघळु लागलं..
      ती का रडत असेल हे साधं विचारायचे सुध्दा त्याने कष्ट घेतले नाहीत.. तो तसाच स्तब्ध उभा राहीला.. पाच मिनीटाने ती शांत झाली आणि त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली काय झालय? .. काही प्रोब्लेम आहे का?? .. आधीचा तु हा नाहीयेस.. तुझ्या स्पर्शातुन जाणवतय मला.. तो काहीच बोलेना.. ती हादरली याचं आपल्यावरचं प्रेम कमी झालं की काय ??.. चार महीन्यात याला अजुन कोणी आवडु लागली की काय??.. हे मी याला कसं विचारु??.. आणि तो जर का हो म्हणाला तर बापरे हे तर मी सहनच करु शकणार नाही म्हणजे आपण एकमेकाना काही महीने भेटलो नाही तर प्रेम कमी होते का किवा संपतं का?तो मात्र एकदम शांत होता.शेवटी काहीतरी बोललं पाहिजे म्हणुन तिने त्याला Love you म्हटलं तरीही त्याची काहीच प्रतिक्रिया नाही..I Love somebody else या वाक्याने ती जागी झाली..तिला दरदरुन घाम फुटला होता म्हणजे हे स्वप्न होतं.. तिला त्या वाक्याने घाम फुटला पण मला हे लिहीताना धडधडतय कारण अशी वेळ कधीच कोणावर येवु नये.. स्वप्नात पण नाही..

कला

 शेजारीच रहायचा तो.. त्याची पेंटींग पाहुन तिने त्याला विचारलं हे तुम्हांला कसं जमतं हो? ..मला शिकवाल का म्हणजे मला काहीच येत नाही यातलं पण कुतुहल खुप आहे या कलेबद्दल.. हो शिकवेन की.. पण खरच मला हे कसं जमतं या मुलीने प्रश्न विचारला आणि तो विचार करु लागला.. त्याने त्याआधी तसा कधी विचारच केला नव्हता.. कागद, रंग, ब्रश हेच त्याचं जग होतं… तासनतास तो त्यात रमायचा… ती त्याच्याकडे जावुन बसायची आणि त्याच्या कागदावर फिरणाऱ्या ब्रशकडे पहात राहायची.. तो ब्रश म्हणजे त्याचं मन होतं… एखाद्या चित्रकाराने नुसता ब्रश जरी फिरवला तरी तिथे काहीतरी अर्थपूर्ण तयार होतच.. मला नेहमी वाटतं ना प्रेमात पडायचं असेल तर ते कलाकाराच्या पडावं मग ती कुठलीही कला असो.. त्यांच्या हातातुन निघणाऱ्या कलाकृतीने आपण का जगावं हे मात्र समजेल..मलाही खुपजण हा प्रश्न विचारतात हे एवढे सुचतं कसं माझ्याकडे तरी कुठे उत्तर आहे याचं.. काल एकीने मेसेज केला तुम्ही कायमच आनंदी कशा असता माझी कला हेच कारण असावं त्याचं..