पुरुष हृदय - भाग १

“कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई” पुरुष हा प्राणी असाच बनवलाय ना निसर्गाने असा म्हणजे नक्की कसा.. प्रत्येकाचा स्त्री कडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच… जसे प्रेमाला वेगवेगळे कांगोरे आहेत ना तसेच पुरुषांना आहेत.. मी चांगल्याच अर्थाने लिहिणारेय.. कारण जवळपास ९५ % मित्र हे पुरुष आहेत आणि त्यांच्याशी चांगलं पटतं पण माझं.. आणि मी प्रत्येकाला  पुस्तकासारखं वाचत असते..वाचताना जाणवलेले त्यातील काही मजेशीर किस्से लिहावे वाटले.. आपली बायको कशी स्वयंपाक करत नाही. मग मी रोज कसा बाहेर  जेवतो.. म्हणजे बायकोबद्दल मैत्रीणीला वाईट सांगुन तिला पटवायचा प्रयत्न .. माझ्याकडे दर महिन्याला इतके लाख येतात म्हणजे मी किती पैसेवाला आहे… एकदा का ती पटली आणि  तिने काही मागितलं  की पैसे कसे कुठे कुठे अडकलेत याची यादी समोर.. तुझी फिगर खुपच छान आहे बायको जाड आहे असं काहीसं… बाकीच्या माझ्या मैत्रीणीपेक्षा तु कशी भारी आहेस हे समजावणं असेल किवा तुला साडी घेउन देइन सांगुन किती तरी महीने लोटतात किवा शॉपिंगला नेइन तुला नेकलेस घेउ सांगुन तर वर्षे जातात.. आईशपथ तुला सांगतो ना तु म्हणजे कतरिना सारखी दिसतेस यार किवा स्मिता पाटील सेम टु सेम.. माझ्याकडे मोठी गाडी किवा मोठा बंगला आहे.. किवा कधी कधी आय लव्ह यु म्हणुन पण.. मी ना सिनेमात काम करतो  देतो तुझी या डिरेक्टर शी ओळख करुन.. तुला फिल्म करायचेय ना थांब माझ्याकडे आहेत प्रोडुसर त्यापेक्षा एक काम कर ना थोडी थांब माझ्याकडे खुप पैसे यायचेत एका व्यवहाराचे त्यात करु ना आपण फिल्म… तुला वाढदिवसाला काय गिफ्ट हवं आणि एकदा का ती पटली की वाढदिवस पण लक्षात नाही रहात. तुला स्पा ला नेतो किवा जेवायला जाऊ…Dp बदलला रे बदलला की लगेच वोव्वोव करत अंबुलन्स सारखं तिच्या मागे फिरायचं काही जण तर मी तुझे सगळे फोटो सेव करुन ठेवलेत… काह्रीही हा श्री घाबरट तु बायकोला घाबरून माझे काय फोटो सेव करणार..😍 ती नाहीच पटली तर मग दुसरी.. हाहाहा..कसे थकत नाही रे मित्रांनो.. बायकाना पटवण्यात एवढी एनर्जी वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ सत्कारणी लावला तर.. कल्याण होइल या जगाचं असं जर का मी म्हटलं तर मग फ्लर्टींग कोण करेल ना.❤. करत रहा.. करत रहा.. 😍

पुरुष हृदय - भाग २

कालच्या “पुरूष हृदय  या लेखावर प्रचंड प्रमाणात माझ्या मित्रांनी कमेंटस केल्या.. मोठ्या मनाने त्यांनी ते स्वीकारलही.. हा खुप जणीनी अनुभव घेतला असेल आणि स्त्री ला सुध्दा बऱ्याच प्रमाणात फ्लर्टींग आवडत पण असेल.. स्त्री आणि पुरुष हे एकमेकाना पुरक आहेत.. निसर्गाची निर्मितीच तशी आहे नाहीतर स्त्रिया सुंदर लाजल्या कशा असत्या ना… हे किस्से गम्मत म्हणुन शेअर करतेय.. अजुन काही किस्से.. माझं तुझ्यावर प्रेम नाही पण तु मला आवडतेस.. अशा वाक्याने मग तिही गोंधळून जाते 😍… मॅम मी तुमच्यापेक्षा लहान आहे तरीही तुम्हांला प्रपोज करायला आवडेल.. ती म्हणते त्यापेक्षा जावई म्हणुन ये कि बाबा.. एक पर्सनल गोष्ट शेअर करायचेय.. extra marriage affair बाबत तुमचं काय मत?? .. अरे त्यापेक्षा मला तुम्ही आवडता सांग की.. वाई वरुन कोल्हापूर कशाला.. तिला स्वित्झर्लंड फिरायचय आणि हा म्हणतो टु व्हीलरवर मुंबई फिरवेन. झेपत नाही तर जातो कशाला त्या वाटेला.. डायमंड शॉप मधे जातो आणि म्हणतो दहा हजारांपर्यंत नाही का काही.. कशाला नको त्या उचापती… तुळशीबाग बरी की मग त्यापेक्षा.. तिची अपेक्षा फायुस्टारला डिनर आणि तो म्हणतो चल श्रीकृष्णची मिसळपाव खाऊ..मॅम तुमचा नंबर द्या म्हणुन इनबॉक्समध्ये शंभर मेसेजेस.. नंबर कशाला हवा तर wp वर चॅट करायला मग मेसेंजरवर काय सुरु आहे भाऊ.. तुम्ही माझ्या मैत्रीण व्हाल का.. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली म्हणजे फ्रेन्ड्स नाही का झालो..  गणितच कळत नाही राव यांचं..कोणाचं काय तर कोणाचं काय..
माझं मात्र तुम्हाला हसवण्याचं काम..
वाचत रहा.. हसत रहा…

पुरुष हृदय - भाग ३

असा पुरुष बनवलाय त्याबद्दल देवाचे आभार.. पण किती भाग लिहु रे.. उचापती संपतच नाहीत यांच्या.. मेसेज करुन करुन मला सांगताहेत आम्ही असं पण करतो😜..त्यामुळे  लिहायला अजुनच हुरुप येतोय.. देवा बरं केलस मला लेखिका बनवलस त्यातुन आडनाव पण गोडबोले😍.. यांच्या हृदयातलं हळुच काढुन पण घेता येतं आणि त्यावर लेखणीने गुलाबी फुंकर पण घालता येते.. तुम्ही आनंद घेताय यातच माझ्या लेखणीचं खरं यश आहे.. अजुन काही पुणेरी किस्से.. एक जण तर त्याला कीतीही चांगले मेसेज पाठवले तरी त्याचं आपलं एकच you are looking beautiful .. मी काय म्हणते हे एकदा बायकोला म्हण. .. रोज अजुन जास्त प्रेम करेल ती..😜.. तुम्ही कितीही लेख लिहा आम्ही फ्लर्टीग करणं सोडणार नाही. नाही म्हणजे नाही  😱.. मी कुठे म्हणतेय फ्लर्टींग करु नका करत रहा मी चौथा भाग लिहीन😛..रोज एक तिचा  फोटो मागतो  मी काय म्हणते ती  काल  दिसत होती  तशीच आज दिसणार ना.. तु मधुबाला सारखी दिसतेस हे अजुन तुला कोणी बोललच असेल .. अरे पण रताळ्या हे तु सांगतोयस की तुला काढुन घ्यायचय माझे अजुन मित्र आहेत का ते.. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यत अजुन कोणी नाही म्हणतो आणि समोरच एकजण येते  हग करुन लव्हयु म्हणुन जाते आता हिला बहीण म्हणावी का मग😂😂😂..वाटत नाही तुझ्याकडे पाहुन एवढा मोठा मुलगा आहे तुला.. चालायला लागल्या लागल्या लगेच लग्न केला ना.. हद्द्च झाली  आता दादा म्हट्लं की मिरच्या झोंबतात .. तुला किती फ्लर्टीग करायचं ते कर बायकोने मेसेज पाहिले तर सेफ होशील ना भाऊ..आज एकाचा मेसेज.. तुमचा नंबर भेटेल का??? आता कसं सांगु रे तुला  ,नंबर भेटत नसतो तर मिळतो.इथुन  पुढे कोणीही मेसेज करताना सांभाळून नाहीतर डेली सोप करावा लागेल यावर😄😄😄😄😄… हसा रे खुप हसा आणि जुने उद्योग सोडु नका.. 

पुरुष हृदय - भाग ४

माझ्या मित्रांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर चौथा भाग लिहायला घेतला.. एकाने तर पेपर ला घेतो हे लेख म्हणुन माझ्याकडुन घेतले.. एकीने तर माझ्यावर लिहा काहीतरी असं  म्हटल्यावर ,आर्चीचा डायलॅग आठवला ना राव.. मराठीत नाही का समजत इंग्रजीत सांगु काय..मी प्रेमा नावाच्या मुलीवर नाही लिहीत प्रेम म्हणजे लव्ह यावर लिहीते.. लाइव्ह येउन गेले तरी म्हणतो मॅडम तुमच्याशी बोलायचय.. आता मात्र याला नवऱ्याच्या तावडीत द्यावा लागणार😂😜.. एकाचं काय तर म्हणे मला तुमच्याशी घट्ट मैत्री करायचेय.. आता हे काय असतय..कोणी इस्कटुन सांगेल काय. साडी घालुन नाही आला तुम्ही लाइव्ह 😍😍अरे बटाट्या साडी नेसतात रे.. ड्रेस घालतात.. कोणाचं काय तर कोणाचं भलतच गडकिल्यावर लिहा .. हे म्हणजे मिलिंद गुणाजीला प्रेम कविता कर म्हणण्यासारखं झालं.. 😛..गळ्यातलं कानात घातलं होतं का ताइ आता काय करु या भावाचं.. फॅशन म्हनत्यात न्हवं त्याला.. 😫.. प्रेमाचा रंग म्हणुन लाल ड्रेस घातला का ?अहो पिवळ्या रंगात पण प्रेम कविता सुचतात हो 😘..ताइ तुम्ही मेसेंजरवर का बोलत नाही हो माझ्याशी.. आता ताइ म्हटल्यावर कुठली बाई याच्याशी चॅट करेल हो😜.. मी काय म्हणतो काल तुम्ही धुळ्यात गेला होता काय प्रोग्रॅमला.. live from dhule असं दिसलं म्हणुन विचारलं.. 😫अरं बाबा स्वयपाक घरातुन बाहेर पडता येत नाही ते फेसबुक वरुन कुठे पण जाऊ शकतो लाईव्ह.. तु डोकं नको खाऊस राव झोप की शांत.. 😥. .कुठुन कुठुन आलेत एक एक.. इथं भेटलात वर नका भेटू…
लिहीता लिहीता खुप हसले..
आता तुमची पाळी हसायची😘😘😄😄😄😄

पुरुष हृदय - भाग ५

अरे तुला हृदय आहे की नाही.. काही भावना आहेत की नाहीत.. माठ आहेस तु .. दगड आहेस तु असं म्हणता म्हणता त्याच्या ह्रदयातुन खुप काही निघालं आणि मला पाचवा भाग पण लिहावा लागला.. पुरूष हृदय वाचायला बायको किवा प्रेयसी असुन उपयोग नाही तर त्यासाठी कवि किवा लेखीका असायला हवं.. बायको किवा प्रेयसी हृदयावर घाव घालु शकतात पण लेखणी हळुवार फुंकर घालुन नकळत त्यातील गुपीत काढुन घेते.. एकाला तर तिचा नंबर मिळाल्याचा इतका आनंद झाला की सुंदरी नावाने नंबर सेव केला आणि बायकोचा मार पण खाल्ला कारण तिचा नंबर जगदंबा नावाने सेव होता.. 😜..मी तुमची रोज आठवण काढतो तुम्हांला मात्र माझ्याशी बोलायला पण वेळ नाही अरे काळ्या ५००० तले १००० लोकांचे असेच मेसेज असतात .. १००० गुणीले १ मिनिट कीती वेळ गेला वाया ..त्या वेळात अजुन दोन भाग लिहुन होतील ना.. 😘😍.. एकाचं काय तुम्ही रागवला काहो माझ्यावर.. मी म्हटलं का बरं??.. मी तर तुमचा नंबर पण नाही सेव केला.. नाव पण माहीत नाही मला तुमचं अहो पण मी तुम्हांला ओळखतो ना.. तुमचे रोज फोटो पहातो.. मागे बघ बायको उभी आहे.. असाच एक पुणेरी टाकला त्या दिवसापासुन तो गायब.. वाघ उभा आहे म्हणाले असते तरीही एवढा घाबरला नसता.. 😜.. मॅडम तुम्हाला काल वाडेश्वरला पाहीलं पण बायको होती सोबत म्हणुन हाक नाही मारली .. मी म्हटलं त्यात काय एवढं  हाक मारायची ना.. अहो तसं नाही तिने एकदा तुमचा फोटो पाहीला आणि म्हणाली आता ही कोण नवीन .. मी म्हटलं तिला ती फोटोत गोरी दिसते .. खरी काळी आहे तुझ्यापेक्षा.. आता खरं काय ते दिसलं असतं ना तर मग माझं काही खरं नव्हतं.. अरे बायकोला इतकं घाबरता तर मग असले उद्योग करताच कशाला😇😄..मॅडम LD नंतर भेटाल का?? मी म्हटलं काही particular reason.. तो म्हणतो मला एवढं इंग्लिश नाही जमत मग देशी जमते का ? असं विचारल्यावर आपण कोणाशी बोलतोय हे नक्कीच त्याला समजलं असेल… 😄😄😄😄… तुम्हांला हुरडा खायचाय ना.. आमच्या शेतात हाय की.. म्हटलं आमचा गृप आहे तर म्हणतो मग पुढच्या वर्षी बघु😄.. हुरडा अचानक गायब शेतातला..
या लेखातील सगळी पात्रे काल्पनिक आहेत.. सादर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा😍

पुरुष हृदय - भाग ६

कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई…पाच भाग लिहुन खुप दिवस झाले आज सहावा भाग लिहावा वाटला कारण माझ्या मित्रांचे कारनामेच तसे … आणि तुम्ही उद्योग केले नाहीत तर मग मी लिहिणार तरी काय आणि आम्ही स्त्रीया अजुन सुंदर तरी कशा दिसणार.. मी कितीही भाग लिहिले तरी तुम्ही फ्लिर्टींग करणं सोडु नका रे बाबानो..😜❤❤एका फ्रेंडचा काल फोन आला म्हणाला तुला रिक्वेस्ट पाठवण्याआधी मी तुझे फोटो पहाण्यात बराच वेळ खर्च केलाय मला जोरात हसायला आलं.हाच वेळ अजुन चांगल्या ठिकाणी खर्च केला असता तर बरच काही घडलं असतं.. कमाल आहे तुमची म्हणुन इतर विषयावर बोलुन फोन ठेवुन दिला.. नवऱ्याला सांगितलं   तर म्हणतो कसा,  म्हणजे माझा चॉइस चांगला आहे तर.. नवरा ही पुरूषच..
.त्याला २२ वर्षांने कळतय त्याचा चॉइस चांगला आहे हे😘😜.. त्यामुळे मित्रांनो सोनलशी बोलताना जरा जपूनच बरं का … लगेचच पुरुष हृदय चा पुढचा भाग तयार होतो.. असाच एक जण तु मॅरीड आहेस का असा काल रात्रीचा मेसेज होता.. त्याला आमच्या तिघांचा फोटो दिला पाठवुन बहुतेक त्याला जावई म्हणुनच आता विचार करावा लागेल😄.. एक मैत्रीण आहे ती सारखी म्हणतेय मी पुरुष असायला हवी होते तुला पटवली असती .. इथे पुरुषांनी नाकी नउ आणलेय त्यात हीची भर😜.. मला मेसेज करुन करुन माझा नंबर मागुन घेतला आणि मेसेज करतोय तुम्हाला माझ्या wp लिस्ट मधे ॲड करु का??.. अरे रताळ्या तुला नंबर दिलाय नारे,  हा प्रश्न कशाला मग..😩असे उद्योग करता म्हणुन मला हे असं लिहावं लागतं…परवा माझं मेसेंजर बंद आहे असा मी फेसबुकवर मेसेज केला.. मला तुमचे मेसेजेस वाचता येतात पण मी रीप्लाय नाही करु शकत तरीही एक बटाटा मला मेसेंजरवर मेसेज करुन विचारतोय मी सांगु का.. आता मी जर का तिथे बोलु शकत नाही तर कसं उत्तर देवु याला😄😄😄😛..मला पुरुष आवडतात याची कारणं हीच आहेत.. असेच रहा रे😄😄😘
 

पुरुष हृदय - भाग ७

धन्य ती पुरुष मंडळी.. मॅम उद्या काय लिहिणार आहात किवा  कुठल्या विषयावर बोलणार आहात .. आम्हाला खुप उत्सुकता असते.. तुमच्या लेखणीने आमची सकाळ मोहक होते.. तुम्ही उप्द्व्याप केले नाहीत तर मॅम काय लिहिणार.. 😄.. एक मेसेज आला मी तुमच्यावर कविता लिहिलेय पण पाठवली तर तुम्ही पुरुष हृदय लिहिता😱 नक्की ही भिती आहे की लेखात हे मी मेंशन करावं म्हणुन चाललेली खटाटोप😛मॅम तुमची रास कोणती हो?? मी म्हटलं धनु रास .. मी विचारलं असं का विचारलं ..त्यावर त्याचं उत्तर  मी गर्लफ्रेंड शोधतोय .. मला तुमच्यासारखी हवेय .. तीला विचारेन तुझी रास धनु आहे का .. हो म्हणाली तर मी तिच्यावर प्रेम करेन.😫देवा वाचव रे.. शरद उपाध्ये सर तुम्ही इतकी वर्षे राशीचक्र चा अभ्यास केला तो वाया गेला .. याचं लॉजिक पहा  भन्नाट आहे😂😂😂.. मग त्याला विचारले तुम्ही कन्या राशीचे आहात का??.. तो म्हणाला मेष.. म्हणजे हा मेंढा ढुशा मारणार ते  ही धनु कशी सहन करेल.. माझा नवरा कन्येचा तोच धनुला झेलु शकतो😇😛😛..सोनल तुझे जवळपास १०० फोटो मी सेव केलेत मी म्हटलं अहो दादा,  वहीनी पाहील की तुमचा फोन ..मला काहीच प्रोब्लेम नाही..😷एका क्षणात सगळे फोटो डीलीट झाले असतील .. आडनाव गोडबोले त्यामुळे कोणाला दुखवायचं नाही 😜.. मॅम ,सर  खुप नशीबवान आहेत तुमचे.. म्हटलं का हो ??.. सेक्सरसाइज सारखे विषय हाताळायला तुम्हाला परवानगी दिलेय.. मी म्हटलं तुम्ही दिली असती का अशी परवानगी तुम्हाला बायकोला ??..त्यावर ते नाही म्हणाले .. या वांग्याना काय माहीत  दुसऱ्याला नशीबवान म्हणणं सोपे असते .. 😳.. उद्या आठवा भाग लिहायला मिळावा म्हणुन सगळ्या कांद्याना शुभेच्छा😍😄

पुरुष हृदय - भाग ८

कठीण कठीण कठीण कीती पुरुष हृदय बाई… ❤.. एक भाग लिहीला आणि पहाता पहाता आज आठव्या भागात पोचले… अजुन किती भाग लिहीता येतात पाहु.. तुम्ही मटेरीअल देत रहा😄.. एक महाभाग (अगदी काल घडलेलाच किस्सा).. मी तुम्हाला संधी देतो माझ्या मुव्हीत.. त्यांनाच कोणीतरी संधी द्यावी अशी परिस्थिती दिसतेय.. आधी ती संधी घे बाबा मग माझं काय ते बघु.. उंटावरुन शेळ्या कशाला😛.. माझ्या पावसात भिजलेल्या फोटोवर मला पाठवा ना फोटो.. मी जर पाठवत नाही तर कशाला स्वताची इज्जत काढुन घेतोस बाबा.. या रताळ्याना या फोटोतुन काय समाधान मिळते काय माहीत.. 😷.. एकाचं काय तर म्हणतो कसा Love you .. त्याला म्हटलं एका प्रोजेक्टला हेल्प कर तर लगेच चॅट बंद.. फुकटच्या बाता😜.. कोणाला काय म्हणतोय कोणाशी काय बोलतोय याचं भान असावं ना..आतापर्यंत जवळपास वीसएक जणानी विचारलय भेटाल का मॅम.. अरे इथे उद्याचा भरोसा नाही.. मी पार्टी देइन म्हणतोय.. अरे हो हो.. २०२० संपुदेत भावा.. हॉटेल उघडुदेत.. नको ती प्लॅनिंग कशाला… 😍.. आमच्याकडे एखादा प्रोग्राम करा कोणाचं काय तर कोणाचं काय .. गेटच्या बाहेर पडता येइना कसले प्रोग्रॅम करता.. मॅम तुम्ही भारी आहात.. म्हटलं नाही हो फक्त ५६ किलो.. 😜 तर म्हणतो कसा माझी बायको ७० किलो.. अरेरे.. बिचारा.. मी केलेला जोक पण कळु नये का याला😍.. एक जण म्हणतो मला जाड स्त्रीया आवडतात काय करेल बिचारा स्वताची बायको जाड आहे😄.. त्याला हे म्हणण्याशिवाय पर्याय नाही.. एकाना म्हटलं , सर सेक्सरसाईज प्रोग्रॅम कसा वाटतोय तर म्हणतात कसे मला खुप एक्स्पीरियंस आहे हे सांगावं लागतय यासारखी शोकांतिका ती काय असावी ना😂😂.. सोनलशी बोलताना जरा सांभाळुन 😱.. पुरुष हृदय पुढचा भाग तयार होणारच.. 😄😄😄

पुरुष हृदय - भाग ९

गेल्या आठवड्यातला किस्स्सा.. स्वतःला विद्बान समजणारे एक सदगृहस्थ फोन करुन सांगताहेत मॅडम तुम्ही खुप हुशार आहात हो.. एखादा मोठा प्रोजेक्ट करा ना??.. म्हटलं तुम्ही बिल्डर आहात .. टाका एखादे करोडभर.. लगेच कामाला लागु..त्यावर म्हणतात कसे साहेब  आता या कोरोनानामुळे ना😱.. हे माहीतेय ना मग फुकटचे पुणेरी सल्ले मागितलेत कोणी..दुसरा एक महाभाग सेक्सरसाइज सारख्या विषयावर बोलायला धाडस लागते ते तुझ्यात आहे पण स्क्रिप्ट रेडी हवी  .. यापुढे असो हा शब्द.. तुला यात काही करायला जमत नाही तर मग बस की वाटाण्या घरात😛..
    मॅडम पुरुषांना जमत नाही ते तुम्ही बाईमाणुस असुन करताय म्हटले आवडतय ना मग शेअर करा … त्याचं काय आहे ना मॅडम आमच्याकडुन आलं की ते कळतय न्हवं.. त्यावर म्हटलं कळुदेत की.. का? काय झालं?? .. तुम्हांला कसं सांगु कळेना.  म्हटलं काहीच सांगु नका.. सनी लिओनीचे व्हीडीओ कसे शेअर होतात पटापट.. 😄चॅट क्लोज.. हम सुधरेंगे नही कभी..
       मॅडम लॉकडाउन नंतर सगळ्यात आधी तुम्ही काय करणार??.. म्हटलं पुरुष हृदय लिहिणं बंद करेन..❤.. अहोबंद नका करु मॅडम .. अहो खरच बंद करणारेय तुम्हांला हसवायला लिहित होते मी हे .. म्हणजे हे खोटं होतं का??.. म्हटलं हो कारण मी लेखीका आहे आणि असं लिहायला जमतं.. सांगितले ते बरं केलं.. खुप दिवसापासून सांगायचं होतं पण भिती वाटत होती तुम्ही पुरूष हृदय लिहिता ना… मग बोला की आता ?? काय सांगायचय??.. मला तुम्ही आवडता.. जाम हसले ना राव.. खरं तर तुम्ही हसावं म्हणुन मी लिहीते या बोक्याने मलाच हसवलं.. 😜😜.. भेटु दहाव्या भागात काही नवीन करामतीसोबत.. तोपर्यंत काळजी घ्या … हसत रहा आणि हसवत रहा😘😍😍.. 

पुरुष हृदय - भाग १०

माझ्या लेखनावर आणि माझ्यावर प्रेम करणारे अनेक आहेत.. पण सगळ्यात जास्त प्रेम पुरुष हृदय या माझ्या लेखांवर केलय कारण पुरुषांच्या हृदयावर प्रेम करणाऱ्या खुप आहेत पण त्यात उतरुन त्या हृदयाची चिरफाड करण्याची संधी मला मिळालेय.. याचं कारण   त्यांनीही ते तेवढेच विनोदी अंगाने घेतलय.. माझा भविष्यवाणी हा लेख सगळ्याना आठवत असेलच त्यावर खुप अभ्यास आहे समजणाऱ्या एकाने मला मेसेज केला संव्तसरात महामारी सांगितली होती हो मॅम .. मी म्हटलं मी पेपर ला जे काही भविष्य येतं त्यावर लिहिलय.. आणि तेही विनोदी अंगाने.. त्यांना म्हटलं एवढे जर का तुम्ही दुखावला गेला असेल तर कोरोना कधी जाणार सांगा आणि त्यावेळी तो गेला तर लोटांगण घालीन येउन.. हे मी कसे सांगणार.. मग नाकाला मिरच्या का झोंबल्या बाबा तुझ्या😄.. जे घडतय तेच मी मांडलय.. स्वीकारायची तयारी ठेवा..
     एक महाभाग मॅडम सेक्सरसाईज विषय मस्त निवडलाय.. मलाही घ्या ना त्यात सामील करुन.. म्हणजे तुमची मुलाखत घ्यायचेय मला.. बरं चालेल म्हटलं.. दुसऱ्या दिवशी लगेच मेसेज I like You😘.. हा काय चावटपणा आहे..
     तुमचे curly hair मस्त आहेत हो.. तुम्ही ते करुन घेतले का की नॅचरल आहेत.. आमच्या घरात सगळे सरळ केस वाले आहेत.. मी म्हटलं तुमच्या डोक्यावर तर काहीच दिसेना की.. 😛त्यावर तो म्हणतो कसा तुम्हाला टकले आवडत नाहीत का??.. आता या गोष्टीचा इथे काय संबंध😱🤔.. मॅम तुम्ही कोकणातले आहात ना.. माझं कोकणी मुलगी करण्याचं स्वप्न होतं मग आता करायचय का पूर्ण??मॅम तुम्ही म्हणत असाल तर सोडतो बायकोला 😇देवा वाचव रे …😜.. भेटायचं काय मग ११ व्या भागात.. भेटावच लागेल..
 

पुरुष हृदय - भाग ११

आजचा हा भाग लिहिणारेय मी बियॉन्ड सेक्स या माझ्या कादंबरीच्या अनुषंगाने.. कारण खुप वर्षे माझं लिखाण फुकट वाचुन माझं कौतुक करणारे , मी तुमचा खुप मोठा फॅन आहे असं सांगणारे किवा तु खुप छान लिहीतेस असं म्हणणारे आज जेव्हा १४० रुपयाची कादंबरी विकत घ्यायची वेळ येते तेव्हा मला फोन करुन अभिनंदन केलं तर सोनल म्हणेल कदाचित कादंबरी विकत घ्या म्हणुन तिला फोनच नको करायला.. किवा गृपवर एक मेसेज करु म्हणजे तिचं कौतुक केल्यासारखे पण होइल आणि पैसेही वाचतील.. 😂😂सोनल ने जेवायला बोलावलं की मी बायकोला पण घेउन येतो म्हणणारे मी किती कादंबऱ्या देउ म्हटल्यावर एकच दे म्हणणारे.. मी कसा किती वरच्या पोस्टवर आहे हे सांगुन हातातुन १४० रुपये सुटताना मारामार😄😄.. प्रमोशन मिळालय सोनल मला असं सांगुन..मग पार्टी कधी??..असं विचारल्यावर   उत्तर काय  तर तुझी पार्टी आल्यावर.खरं तर माझ्या सगळ्या मित्रांना माहीतेय सोनल न खाता पिता घरातुन कोणाला बाहेर जाऊ देत नाही..अगदी आजचाच ताजा किस्सा सांगते माझ्या एका मित्राने आमच्या एका कॉमन मित्राला विचारलं अरे सोनलची कादंबरी नाही का वाचायची तर म्हणतो कसा दे ना वाचुन परत देतो😩.. बॅंकेत नोकरीला.. कमवतो लाखभर रुपये… स्वतःच स्वतःची लाज काढुन कशाला घ्यायची..😛.. कादंबरी वाचण्याची उत्सुकता आहे पण सोनल म्हणतेय का घेउन जारे फुकट याची वाट पहायची..
     याच्या उलट ४ दिवस आधीच माझ्या अकाउंट ला पैसे पाठवुन नंतर नेतो गं पुस्तके .. असेही सांगणारे मित्र आहेत..  एक कादंबरी नेउन आधीच अजुन ९ कादंबरीचे पैसे देउन जाणारेही आहेतच… फुकट ते पोष्टिक म्हणत एका कादंबरीत डिस्काउंट मागणारे महाभाग पण आहेत.. बापरे सेक्स नाव आहे मग घरच्या पत्त्यावर नको म्हणत लपुन वाचणारेही आहेत अरे पण भावानो मित्रांनो लपुन नका रे वाचु … समाजात वावरताना मला समाजाला असा कुठलाही मेसेज नाही द्यायचाय उलट मला समाजाची मानसिकता बदलायचेय आणि लेखिका म्हणुन ताठ मानेने या जगात वावरायचय.. १४० रुपयात तुम्ही कल्पना नाही करणार असा मेसेज देउन प्रत्येक स्रीकडे आणि प्रेम या पवित्र नात्याकडे पहाण्याची नजर आपल्याला बदलायचेय.. जसं चेस खेळल्याने तुमची एकाग्रता वाढते तसच ही कादंबरी वाचुन तुमच्या मनात  असलेली प्रेमाद्दल आणि मैत्रीबद्दलची व्याख्याच बदलेल.
सोच बदलो … देश बदलेगा..

पुरुष हृदय - भाग १२

आता मात्र तुम्ही पोट आणि तोंड दुखेपर्यंत हसाल कारण हे ऐकुन मी स्वतः इतकी हसलेय ना की पुरुष हृदय मधुन तुमच्यापर्यंत हे पोचवावं वाटलं.. चार दिवसांपुर्वी एका व्यक्तीचा फोन आला .. मॅडम मी तुम्ही दिलेल्या साईटवरुन दहा पुस्तके मागवली होती.. म्हटलं कुठल्या साईटवरुन?? त्या साईटचं नाव पण सांगता येइना.. पुढची थाप अशी की त्यातील एक पण पुस्तक मला वाचायला शिल्लक राहिलं नाही त्यामुळे मी पुस्तक घ्यायला येइन.. मी बरं म्हटलं आणि थापा आहेत हे लक्षात आल्यावर मी म्हटले तुमच्याकडे त्याची स्लिप असेल ना बुकींची ती पाठवा.. समोरुन मोठा पॉज आला आणि अजुन एक थाप आली की मी माझ्या नावावर नाही बुक केलं मी म्हटले ज्याच्या नावाने असेल त्या नावाने असेल ते पाठवा.. पुढची थाप नंबर ६ की मी प्रवासात आहे घरी गेलो की पाठवतो.. बहुधा ती व्यक्ती अजुन घरी पोचलेली दिसत नाही😂😂😂😂😂😂😂😂😂😂.. हसा रे लय हसा.. असे वाटाणे लय भेटतात फुटाफुटावर.. आणि कमेंटमधे ही व्यक्ती कुठल्या राशीची असेल तेही सांगा.. थापा मारणे.. बढाया मारणे.. भयंकर चेंगट .. मोठेपणा सांगणे ही रास म्हणजे….. बघु कोण ओळखतं ते.. माझ्या संपर्कात या राशीची खुप लोक आहेत.. या लोकांशी जेवढ्यास तेवढी मैत्री ठेवा.. 😂😂
       सोनल ५०० प्रती विकल्या गेल्या म्हणुन मला अभिनंदनाचा फोन आला पण विकत घ्यायची कादंबरी तर खिशात हात घालावा लागणार आता हे अवघड हुतय न्हवं😜.. सोनल पुढचं पुस्तक फुकट काढ गं.. पहिल्या दहा दिवसांत एक आवृत्ती संपेल तुझी असा बहुधा मनीविचार असावा आणि हो आम्ही तुझे वेलविशर्स आहोत हे सांगायला मात्र ते विसरले नाहीत😄😄😄😄.. या वाक्यावर तर सोनल ने पुढचं पुस्तक फुकट काढलच पाहिजे..
आणि हा योगायोग म्हणायचा का तर वरील दोन्ही पात्रांची आडनावे सारखीच आहेत ..ओळखा पाहु?? .. रास आणि आडनावे करेक्ट ओळखणाऱ्याला माझ्याकडून कॉफी.. ही थाप नाहीये..😄😄..
हा निव्वळ योगायोग आहे.. लेखिकेला जबाबदार धरु नये😄